राहुल गांधींना सुनावत माजी खासदार एम. ए. खान यांचा काँग्रेसला रामराम

कॉंग्रेस पक्षाला तेलंगानामधून एक मोठा धक्का बसला आहे.

राहुल गांधींना सुनावत माजी खासदार एम. ए. खान यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होत असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जम्मू- काश्मीरमधील महत्त्वाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असताना आता पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत राजीनामा दिला आहे.

“मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधीं हे पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळत असल्यापासून पक्षाची परिस्थिती अधिकच खराब होत गेली आहे. राहुल गांधींकडे त्यांची अशी एक वेगळीच विचारसरणी आहे. पण ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही,” अशी टीका खान यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

“राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं, हे माहित नाही. राहुल गांधींच्या या धोरणाचा परिणाम म्हणून आज काँग्रेसची वाताहत झाली आहे. पक्ष अशा पातळीला येऊन पोहोचला आहे, जिथे गेली अनेक दशकं पक्ष उभारणीचं काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत,” असा घाणाघात एम. ए. खान यांनी केला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर

मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

गुलाम नबी आझाद यांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version