विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते वादळाच्या पाहणीसाठी कोकणाचा दौरा काढला. पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज कोकण दौरा काढला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी खरपूस टीका केली आहे. गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळाच्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई आजवर सरकारने दिलेली नसताना आताच्या चक्रीवादळातील पीडितांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री कसे काय देतात, असा प्रहार भातखळकर यांनी या ट्विटमधून केला आहे.
येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण केल्यावर मदतीची घोषणा केली जाईल असे कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री सांगताहेत.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसान भरपाई अजूनही कोकणवासीयांना मिळालेली नसताना परत एवढे धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस यांना येते कुठून ? बहुदा हा सामना इफेक्ट असावा. pic.twitter.com/unAVimCyhY— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 21, 2021
“येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण केल्यावर मदतीची घोषणा केली जाईल असे कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री सांगताहेत. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसान भरपाई अजूनही कोकणवासीयांना मिळालेली नसताना परत एवढे धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस यांना येते कुठून ? बहुदा हा सामना इफेक्ट असावा.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर
आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ मे) रत्नागिरीला भेट दिली आणि नंतर ते सिंधुदुर्गमध्ये वायरी गावात गेले. तेथे त्यांनी पंचनामे झाल्यानंतर कोणत्या निकषानुसार मदत देता येईल, ते जाहीर होईल असे सांगितले. जे काह शक्य आहे तेवढे दिले जाईल, असेही मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहे. गेल्यावर्षी निसर्ग वादळामुळे कोकणाला फटका बसला होता. आता तौक्ते चक्रीवादळामुळे फटका बसल्याने मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार याची प्रतीक्षा होती. पण त्यांनी थेट मदत जाहीर केलेली नाही. हा पाहणी दौरा चार-पाच तासांचा होता.