कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस

कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस

महाराष्ट्रात एकीकडे लसीकरणच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोविड लसीची साठेबाजी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लिगल राईट्स ऑब्जरवेटरी या सामाजिक न्यायासाठी काम कारणाऱ्या संस्थेतर्फे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या लसींचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण केले गेले. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून अपेक्षित लस पूरवठा होत नसल्याचे सांगितले तर अनेक ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. पण या सगळ्यात महाराष्ट्र सरकार पाहिल्यापासुनच तोंडावर पडताना दिसत आहे. आधी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी एका पात्रातून ठाकरे सरकारची पोलखोल केली तर नंतर महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचेच एक पत्रक समोर आले ज्यावरून ठाकरे सरकारच्या साठेबाजीची पोलखोल होत आहे.

हे ही वाचा:

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

भारतात येऊ शकतात पाच नव्या लसी

भारताचा जागतिक ‘लसोत्सव’

रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

राज्यात ३ लाख लसी शिल्लक असतांना ही लस फक्त ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांनाच देण्यात यावी असे आदेश ठाकरे सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना लस उपलब्ध असूनही ती देण्यात आली नाही. याच मुद्द्यावरून आरोग्य मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोविड वॅक्सिनचा साठा करून, लसीकरण बंद करून नागरिकांची पिळवणुक केल्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिव यांना आवश्यक वस्तु अधिनियम १९५५, महामारी रोग कायदा १८८७ या कायद्यांच्या अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. या साठेबाजीमुळे काळाबाजाराला प्रोत्साहन मिळाले असेही एलआरओ कडून म्हटले आहे.

Exit mobile version