“लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”

“लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”

केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला आहे. रविवारी कासारगोड येथून भारतीय जनता पक्षाच्या ‘विजया’ यात्रेला हिरवा झेंडा दाखवत आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’ला आळा घालण्यासाठी केरळचे एलडीएफचे सरकार काहीही करत नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, “केरळ उच्च न्यायालयाने केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या कटाचा भाग म्हणून ‘लव्ह जिहाद’ असल्याचे म्हटले होते, परंतु त्यानंतरही या विषयावर एलडीएफ (कम्युनिस्ट प्रणीत सरकार) किंवा युडीएफ (काँग्रेस प्रणीत सरकार) सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

२००९ मध्ये केरळच्या हायकोर्टाने म्हटले होते की, “लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनविण्याच्या षडयंत्राचा एक भाग आहे. असे असूनही, सरकार झोपी गेले आहे आणि केरळ आणि देशाविरूद्ध कट रचल्याची त्यांना पर्वाही नाही.” असे योगी आदित्यनाथ यांनी पार्टीच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला भाजपचे केरळचे अध्यक्ष के. सुरेंद्रनही उपस्थित होते. उत्तर प्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’विरूद्ध कठोर कायदा केला आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

हे ही वाचा:

ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात

याच कार्यक्रमात ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

Exit mobile version