ऐन सणासुदीच्या काळावर पावसाने अवकृपा दर्शविली आहे. सणासुदीच्या काळात फुलांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी असते. खासकरून गणपतीसाठी अनेकजण फुलांची आरास करतात. परंतु पावसामुळे अक्षरशः व्यापारी वर्गाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. राज्यभरात पडणारा पाऊस फुलांसाठी नासाडी करणारा ठरला.
पावसामुळे फुले कोमेजून गेली आहेत. तसेच बाजारात यंदा ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे फुलव्यापारी कोसळून गेलेला आहे. आपल्याकडे शुभकार्यासाठी फुले देवाला अर्पण केली जातात. याकरता बाजार गाठून घावूक दराने फुले खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु या बाजारातही सध्या चैतन्य दिसून येत नाही. एरवी तेरवी फुलांचा बाजार म्हणजे माणसाला पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी असते.
निर्बंधजाचात अनेक मंडळांनी गणपतीही बसवलेला नाही. त्यामुळेच फुलांची मागणी मंडळांकडूनही चांगलीच रोडावली आहे. केवळ इतकेच नाही तर गेले काही महिने मंदिरे बंद असल्यामुळे सुद्धा फुलाचा व्यवसाय चांगलाच आर्थिक संकटात सापडलेला आहे. मुंबईतील बहुतांशी मंडळांमध्ये फुलांचे देखावे असतात.परंतु यंदा ती मागणी कमी झाल्यामुळेही नुकसान मोठे होते आहे. यंदा फुलानांही मनासारखा दर नाही. झेंडूचा दर सणासुदीला ८० रुपये किलो इतका असतो. तो दर आता ५० वर येऊन ठेपलेला आहे. एकीकडे निर्बंध फेरा तर दुसरीकडे निसर्गही कोपलेला अशा दोन्ही बाजूंनी व्यापारी वर्ग कोंडीत सापडलेला आहे. निर्बंधांमुळे अनेक सण व्यापारी वर्गाच्या हातून जात आहेत. ते नुकसान वेगळेच. सध्याच्या घडीला फुलव्यापारी म्हणूनच चांगलाच संकटात सापडलेला आहे.
हे ही वाचा:
गजवदनाच्या स्वागतासाठी गजबजल्या बाजारपेठा
पोलिसांच्या बदल्यांना मिळाला गणेशोत्सवाचा मुहूर्त
दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाइन असा…
साकीनाक्यात ‘निर्भया’च्या पुनरावृत्तीने खळबळ
पावसामुळे भिजलेली फुले ही फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे त्या फुलांचा भावही चांगलाच उतरलेला आहे. हवामानातील बदल यामुळेच फुले कोमेजण्याची प्रक्रीया सुद्धा वेगाने होऊ घातली आहे. व्यापारी वर्ग जवळपास 30 टक्के माल यामुळेच फेकून देऊ लागले आहेत.