पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करून आवताडेंच्या भाळी विजयी गुलाल लागला आहे. निवडणूक आयोगाकडून आवताडेंच्या विजयाची अधिकृत घोषणा केली असून आता आवताडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

१७ एप्रिल रोजी झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली. यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपाकडून समाधान औताडे यांना रिंगणात उतरवण्यात आले. आज २ मे रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात आवताडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भालके यांचा ३७१६ मतांनी पराभव केला आहे.

हे ही वाचा:

एक पाऊल पुढे टाका, भाजपा हाच एकमेव पर्याय आहे

पश्चिम बंगाल निवडणुकीने घेतली प्रशांत किशोर यांची विकेट

समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा निसटता विजय

आवताडे यांच्या विजयाबद्दल त्यांच्यावर आणि पक्षावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पंढरपुरात भाजपाला विठ्ठल पावला अशी प्रतिक्रिया दिली आहे. आवताडेंनी भकास आघडीच्या भालकेंना धूळ चारली. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

Exit mobile version