लूट आणि वसुली हा महाराष्ट्र सरकारचा एकमात्र कार्यक्रम

लूट आणि वसुली हा महाराष्ट्र सरकारचा एकमात्र कार्यक्रम

.The Union Minister for Environment, Forest & Climate Change, Information & Broadcasting and Heavy Industries and Public Enterprise, Shri Prakash Javadekar holding a press conference on Cabinet Decisions, in New Delhi on October 21, 2020.

गुरुवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. बुधवारी वाझे याने लिहिलेल्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून जावडेकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एमव्हीए म्हणजे महावसुली आघाडी हे आता स्पष्ट झाले आहे आणि या सरकारचा किमान सामान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकडून वसुली करणे हाच आहे असे जावडेकर म्हणाले.

एनआयएच्या कोठडीत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या लेटरबॉंम्बने बुधवारी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. वाझे याच्या या कथित पत्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर असे आरोप करण्यात आले आहेत. या लेटरबॉंम्बमधील आरोपांवरूनच प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला फैलावर घेतले.

हे ही वाचा:

अनिल परबांनी राजीनामा द्यावा

मुंबई लोकल पुन्हा बंद?

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

काय म्हणले जावडेकर?
प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना गेल्या महिन्या दोन महिन्यात झालेल्या सर्व घटनांचा लेखाजोखा मांडला. गेल्यानं महिन्या दोन महिन्यात घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लख्तरे निघाली आहेत. पोलीसच बॉंम्ब ठेवतात हे लोकांनी पहिल्यांदा पाहिले. या सचिन वाझेचे शिवसेनेसोबत संबंध होते म्हणून सुरवातीला शिवसेना त्यांना पाठीशी घालत होती असे म्हणत पुराव्यादाखल जावडेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे वाझेचे समर्थन करणारे व्हिडीओ लावून दाखवले.

वाझे याने पत्रातून केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. त्याने तीन मंत्र्यांची नावे घेऊन अडीचशे कोटीची वसुली करायला सांगितल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे की त्यांचा नेमका कार्यक्रम काय आहे? फक्त लूट करायला ते सत्तेत आले आहेत का? लूटी व्यतिरिक्त ते महाराष्ट्रात काय करत आहेत असा सवालही जावडेकरांनी केला.

महाराष्ट्र सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाहीये. शिवसेना आमच्यासोबत निवडणूक लढली. मोदींच्या नावावर लोकांनी त्यांना मतं दिली. पण नंतर ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले अशा दोन पक्षांसोबत शिवसेना गेली आणि सरकार स्थापन केले. कारण लूट हाच त्यांचा समान कार्यक्रम होता असे जावडेकर म्हणाले.

Exit mobile version