या पुढे महाराष्ट्रातील मंत्र्यांना परदेश दौऱ्यासाठी स्पष्टीकरण देण्याच गरज असणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे नियम शिथिल केले आहेत. मात्र त्याच वेळी अधिकाऱ्यांसाठीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाच्या सचिवाकडे त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी स्पष्टीकरण आणि परवानगी देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
ठाकरे सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशानुसार, सरकारी अधिकाऱ्यांना यापुढे त्यांच्या विदेशी अभ्यास दौऱ्यासाठी, आंतरराष्ट्रीय कार्यशाळांसाठी, औद्योगिक भेटींसाठी, पर्यटनाला चालना देणाऱ्या परिषदेसाठी जाण्यापूर्वी अनेक अटींची पुर्तता करणे आवश्यक असेल.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर होणारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी टाळता यावी यासाठी, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध घातले होते. मात्र ठाकरे सरकारने हे निर्बंध रद्द केले असून चाप मात्र अधिकाऱ्यांच्या परदेशगमनावर लावला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. याबद्दल ट्वीट करताना ते म्हणाले आहेत, “मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीतला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशी साठी पैशाची कमी नाही.”
मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीतला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशी साठी पैशाची कमी नाही. pic.twitter.com/Uzk1CALso4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2021