कोरोना महामारीत कोरोना झालेल्या सर्वसामान्यांना खासगी रुग्णलयाचा उपचार परवडत नसल्याने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यामध्ये अनेक रुग्णाचे हाल झाले उपचार वेळेवर झाले नाहीत. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. या नेत्यांचे उपचारावेळी झालेलं बिल हे सरकारच्या तिजोरीतून भरल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीच्या १८ नेत्यांनी कोरोना काळात कोरोना झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार घेतले खासगी रुग्णलयात आणि १ कोटी ४० लाख रुपयांचं बिल मात्र सरकारच्या तिजोरीतून भरण्यात आले आहे. यातील सर्वात जास्त बिल हे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आहे. जे राज्यला कोरोना काळात काळजी घ्यायचे आणि सरकारी रुग्णालयातून उपचार घेण्याचे सल्ले देत होते त्यांनीच सरकारी रुग्णलायकडे पाठ फिरवत खासगी रुग्णलयात उपचार घेतले आहे. एकट्या राजेश टोपेंचे ३४ लाख ४० हजार बिल सरकारच्या तिजोरीतून भरण्यात आले आहे.
हे ही वाचा:
खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख
दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी
नेते नितीन राऊत यांचे १७ लाख ६३ हजार, हसन मुश्रीफ यांचे १४ लाख ५६ हजार, छगन भुजबळ यांचे जवळपास ९ लाख तसेच सुनील केदार यांचे ९ लाख ७१ हजारांचे आणि अनिल परबांचे जवळपास ६ लाखांचे बिल हे सरकारी तिजोरीतून भरण्यात आले आहेत. त्याशिवाय अब्दुल सत्तर, सुभाष देसाई, जयंत पाटील या ९ नेत्यांची नावे समोर आलेली आहेत. अजून यातील ९ नावे समोर येणे बाकी आहेत. मात्र या एकूण १८ नेत्यांच्या बिलाची रक्कम सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहे. नेत्यांचा सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.