लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक पुरस्कार कार्यक्रमात केले नमन

लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या सन्मानाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांच्या नावाने आपल्या राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे, हे आपले परमभाग्य असल्याचे म्हटले. मोदी या सत्काराला कसे उत्तर देणार याबद्दल कुतुहल होते. मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर मोदी मोदीचा नारा गुंजला.

 

 

मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. ते म्हणाले की, आज या महत्त्वाच्या दिवशी मला पुण्याच्या या पावन भूमीवर महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुढे मोदी म्हणाले की, हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी इथे येऊन एवढा उत्साहित आहेत तेवढाच भावूकही झालो आहे. आमचे आदर्श व भारताचे गौरव बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठे यांचीही जयंती आहे. लोकमान्य टिळक भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या कपाळावरील टिळा आहेत. अण्णाभाऊंनीही समाजसुधारणेत जे योगदान दिले ते अप्रतिम आहे. असाधारण आहे. दोन्ही महापुरुषांना मी नमन करतो.

 

 

ही पूण्यभूमी शिवाजी महाराजांची धर्ती आहे. चाफेकर बंधूंची पवित्र धर्ती आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचे आदर्श जोडले गेलेले आहेत. दगडूशेठ हलवाई मंदिरात गणपतीचा आशीर्वाद घेतला. दगडूशेठ पहिले व्यक्ती होते ज्यांनी टिळकांच्या आवाहनावर गणेशप्रतिमेच्या स्थापनेत सहभागी झाले. मी या धर्तीला प्रणाम करताना सगळ्या महान विभूतींना नमन करतो.

 

हे ही वाचा:

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा

इस्लाम स्वीकारल्याबद्दल अंजूला मिळाले पैसे आणि जमीन

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

मोदींनी पुण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, आज पुण्यात आपल्या उपस्थितीत मी हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव घेत आहे. जी जागा आणि जी संस्था थेट टिळकांशी जोडलेली आहे त्यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. हिंद स्वराज्य संघाचे त्याबद्दल आभार.

 

पुणे काशी यांची तुलना

 

आमच्या देशात काशी आणि पुणे दोन्हीची वेगळी ओळख आहे. विद्वत्ता इथे चिरंजीव आहे, अमरत्व मिळाले आहे. पुणे विद्वत्तेचे दुसरे नाव. या भूमीवर सन्मानित होणे यापेक्षा वेगळा अभिमानाचा क्षण नाही. पण मित्रहो पुरस्कार मिळतो तेव्हा एक जबाबदारीही येते. आज या पुरस्काराशी टिळकांचे नाव जोडले गेले असेल तर ही जबाबदारी आणखी वाढते. मी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला १४० कोटी देशवासियांच्या चरणी अर्पण करतो. मी देशवासियांना विश्वास देतो की, त्यांच्या सेवेत त्यांच्या आशा अपेक्षांच्या पूर्तीत कसर राहणार नाही.

Exit mobile version