भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह यांना लोकसभेला तिकीट मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असताना भाजपाने कैसरगंज या त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ केली आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह आणि कैसरगंज इथून करण भूषण सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. करण भूषण सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र आहेत.
भाजपाने गुरुवारी संध्याकाळी ही घोषणा केली. करण भूषण हे यूपी रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते भारतीय कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा होते, परंतु त्यांच्या वडिलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे पदही सोडले. कैसरगंजमध्ये ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे करण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हे ही वाचा:
दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!
भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना
करण भूषण यांचा जन्म १३ डिसेंबर १९९० रोजी झाला. डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिले आहे. गोंडा येथील वडिलांच्या नंदिनी महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. ऑस्ट्रेलियातून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. सध्या ते उत्तर प्रदेश कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये कुस्ती संघटनेच्या निवडणुका झाल्या. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत करणची यूपी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.