संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासूनच विरोधकांकडून गदारोळ सुरु करण्यात आला होता. १९ जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरु करण्यात आले होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेतून सावरल्यानंतर आणि मोदींच्या मंत्रीमंडळात मोठे बदल झाल्यानंतर हे संसदेचे अधिवेशन होते. त्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचे आहे. मोदींनी अधिवेशनापूर्वी विरोधकांना सरकारची उत्तरेदेखील शांतपणे ऐकून घेण्याची विनंती केली होती, मात्र तरीही संसदेचे अधिवेशन चालू झाल्यानंतर काही काळातच विरोधकांनी गोंधळ घालून प्रथम लोकसभा आणि नंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी बंद पाडले. त्यामुळे रोज अधिवेशनात बंद पाडण्याचे काम विरोधकांनी केले.
मोदींनी या अधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सरकार सर्व प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार आहे. विरोधकांनी अधिकाधीक तिखट प्रश्न विचारावेत मात्र त्याचवेळी सरकारची उत्तरे देखील ऐकून घ्यावीत आणि शांतपणे सदनाचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन केले होते. मात्र विरोधकांनी या आवाहनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे कामकाड सुरू झाल्यानंतरच्या काही वेळातच लक्षात आले.
हे ही वाचा:
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शाह देखील मोदींबरोबर उपस्थित होते.