27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणलॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?

लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?

Google News Follow

Related

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याचंही कळतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.

राज्यात सध्या १ जून सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. सरकारने लागू केलेल्या या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्यामुळे लॉकडाऊन उठवावा अशी मागणी व्यापाऱ्यांपासून नागरिक करत आहेत. आजच्या बैठकीत लॉकडाऊन संपूर्ण उठणार का, निर्बंध शिथिल होणार की लॉकडाऊन कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.

दरम्यान लॉकडाऊनबाबत राज्य सरकार सध्या दोन प्रस्तावांचा विचार करत असल्याचं समजतं. पहिला प्रस्ताव म्हणजे १ किंवा ७ जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करणं. परंतु राज्यातील अनलॉक प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडेल, असंही म्हटलं जात आहे. शिवाय मुंबई शहराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन एकदम उघडणार नाही, असं सांगितलं होतं.

हे ही वाचा:

हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?

कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?

पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं सुरु होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया १ जूनपासून करायची की ७ जूनपासून याबाबतचा अंतिम निर्णय आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.

तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकानं सुरु करण्याची परवानगी दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल, असं समजतं. मात्र ही दुकानं दिवसाआड सुरु राहतील.

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, मद्याची दुकानं निर्बंधासह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. हॉटेलांना ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळू शकते.

मात्र शाळा आणि महाविद्यालये तूर्तास बंद राहतील. तर मुंबई लोकल गाड्या अनलॉकच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात पुन्हा सुरु होऊ शकतील असं कळतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा