मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, ३० एप्रिल रोजी राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याची कोविड विषयक परिस्तिथी जनतेसमोर ठेवली. राज्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची रुग्णसंख्या कमी होत आहे असे विधान यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. पण राज्याची कोविड रुग्णांची वाढती आकडेवारी मात्र वेगळेच चित्र समोर ठेवत आहे.
देशात कोविडची दुसरी लाट सुरु आहे. ह्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अखेर १५ एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आणि नंतर हे निर्बंध अधिक कडक करण्यात आले. आधी पंधरा दिवसांसाठी लावलेला हा लॉकडाऊन नंतर आणखीन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात आला. सध्या १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्ण संख्येत घट होत असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असले तरीही परिस्थिती मात्र वेगळी आहे.
हे ही वाचा:
जिहादी उस्मानी विरोधात नेटकऱ्यांचा संताप
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून चित्र अस्पष्टच!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी
लागोपाठ दोन शरीरसौष्ठवपटू करोनाने गेले!
महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यापूर्वीची स्थिती पाहिली तर १४ एप्रिल रोजी राज्यात ५८,९५२ रुग्ण आढळून आले होते तर १५ एप्रिलला ६१,६९५ लोक कोरोनाबाधित झाले. पण या नंतरची आकडेवारी पहिली तर त्यात एखाद दोन दिवसांचे अपवाद वगळता कोरोना रुग्णांची संख्या ही लॉकडाऊन लावल्यानंतरही हजारोंच्या संख्येने वाढताना दिसत आहेत.
३० एप्रिल ६२,९१९
२९ एप्रिल ६६,१५९
२८ एप्रिल ६३,३०९
२७ एप्रिल ६६,३५८
२६ एप्रिल ४८,७००
२५ एप्रिल ६६,१९१
२४ एप्रिल ६७,१६०
२३ एप्रिल ६६,८३६
२२ एप्रिल ६७,०१३
२१ एप्रिल ६७,४६८
२० एप्रिल ६२,०९७
१९ एप्रिल ५८,९२४
१८ एप्रिल ६८,६३१
१७ एप्रिल ६७,१२३
१६ एप्रिल ६३,६२९