महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील वाढता कोरोना, लॉकडाऊन, निर्बंध यावर भाष्य केले. गेल्यावेळी मुंबईकरांच्या सहकार्याने कोरोना आटोक्यात आणणं शक्य झालं होतं. त्यामुळे आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
लॉकडाऊन कोणालाच नको. पण निर्बंध घालून दिल्यानंतरही कोणीच पाळणार नसेल तर तुम्हीच सांगा नियम कसे द्यावेत. रुग्णांची संख्या, मृतांचा आकडा वाढतो आहे. काहीच करणार नाही, असे होणार नाही. कारण सर्वांचा जीव लाखमोलाचा आहे. गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
प्रत्येक समाजाच्या घटकाची मत जाणून घेतात. कोरोनाची लाट येत आहे. अर्धवट ती आली आहे. जर ती रोखायची असेल तर सर्वांनी सहकार्य करायला हवं. मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही. अजून सूचना आलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेवर आम्ही भर देत आहोत. असंही त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय
कोरोनाचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. कारण नसताना घराबाहेर जाऊ नका. मास्क लावा, हे जर पाळलं तर येत्या दोन किंवा चार महिन्यात कोरोना रुग्ण कमी होईल. मुंबईकरांच्या सहकार्याने त्यावेळी कोरोना आटोक्यात आणणं शक्य झालं होतं. त्यामुळे आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.