29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणलॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह

लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह

सध्या आठवडाअखेर लॉकडाउन सुरू असला तरी कधी संपूर्ण लॉकडाउन लागेल हे सांगता येणे कठीण आहे. आता कठोर निर्बंध तर आहेतच पण शुक्रवारपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाउनही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे खरेच, पण महाराष्ट्रातील जनतेला लॉकडाउनही नको आहे.

Google News Follow

Related

गेल्या वर्षी अगदी याच महिन्यात अवघा महाराष्ट्र लॉकडाउनचा अनुभव घेत होता. मात्र ती परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रावर ओढवली आहे. सध्या देशातील सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची टांगती तलवार महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. सध्या आठवडाअखेर लॉकडाउन सुरू असला तरी कधी संपूर्ण लॉकडाउन लागेल हे सांगता येणे कठीण आहे. आता कठोर निर्बंध तर आहेतच पण शुक्रवारपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाउनही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे खरेच, पण महाराष्ट्रातील जनतेला लॉकडाउनही नको आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाउनमुळे पिचलेले लोक आता लॉकडाउनच्या संपूर्ण विरोधात आहेत. निर्बंध ठेवा, पण लॉकडाउन नको अशी जनसामान्यांची आणि व्यावसायिक, उद्योगांची आणि व्यापाऱ्यांचीही तीव्र भावना आहे. व्यापाऱ्यांनी तर सोमवारपासून दुकाने उघडी ठेवण्याचा इशाराही दिला आहे. मात्र ठाकरे सरकार याबाबत अजूनही संभ्रमावस्थेत आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि लॉकडाउनचे संकेत दिले. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे, चिंतेचे वातावरण आहे. खरे तर, करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या सरकारला लोकांना दिलासा देणे जमलेले नाही. या सरकारकडून धाडसी निर्णय घेतले गेलेले नाहीत. वर्षभरानंतरही हीच परिस्थिती कायम असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे रेल्वे, बसगाड्या, सार्वजनिक वाहने, रिक्षा, टॅक्सी सगळे सुरू असताना दुकाने बंद ठेवून अर्थचक्र कसे सुरू राहणार हा दुकानदार, व्यापाऱ्यांचा प्रश्न अनाठायी नाही. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना बाकी व्यवसाय नको, यामागील गणितच कुणाला कळत नाही. हार्डवेअर, सलून, सोन्याचांदीची दुकाने बंद ठेवा यामागील कारणमीमांसा पटणारी नाही. अन्नधान्याच्या दुकानांत किंवा भाज्यांच्या खरेदीसाठी जी झुंबड उडते तेवढी या अन्य दुकानांत नसते. मग ती दुकाने बंद ठेवून नेमके करोनाला कसे काय थोपवता येते, हा प्रश्न लोकांना पडला आहे. आता कुठे त्यांचा व्यवसाय रुळावर येत असताना लॉकडाउन लागला तर पुन्हा तो गाडा गाळात रुतणार आहे. शिवाय, लॉकडाउनचा उपाय कितीवेळा अमलात आणणार हा प्रश्नही प्रत्येकाला भेडसावत आहे. एप्रिलअखेरपर्यंत जर लॉकडाउन लावण्यात आला तर त्यानंतर पुन्हा अनलॉक होणार का, की त्यानंतरही लॉकडाउन सुरूच राहणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एका मर्यादेत काही निर्बंध घालत करोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

हे ही वाचा:

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

भारतात येऊ शकतात पाच नव्या लसी

मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’

पश्चिम बंगालमधून स्फोटक साहित्य जप्त

आधीच, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, व्यवसाय बंद पडले आहेत, अनेकांनी नोकरी सुटल्यावर नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा संपूर्ण लॉकडाउन हा त्यांच्या जगण्यावरच घाला ठरणार आहे. मध्यंतरी एका बटाटेवडेवाल्याचा व्हीडिओ खूप गाजला होता. पुण्यातील या व्यावसायिकाने महत्प्रयासाने बटाटेवड्यांचा व्यवसाय सुरू केला, पण मिनी लॉकडाउनमुळे त्याच्या व्यवसायावर बंदीची वेळ आली. भाडे तर भरायचे आहे पण उत्पन्न नाही, अशा कोंडीत सापडलेला तो वडेवाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा टाहो फोडताना त्या व्हीडिओत दिसला होता. अशीच परिस्थिती अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांची आहे. एकीकडे कठोर निर्बंधांच्या नावावर जवळपास सगळीकडे लॉकडाउनचीच स्थिती आहे. तोच लॉकडाउन १०० टक्के करण्यात आला तर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा किती कालावधी लागेल हे सांगता येणे कठीण आहे. लॉकडाउन हाच उपाय आहे, असे बोलून आपली सुटका करून घेता येणार नाही. धाडस दाखवावे लागेल. आजारावर एकीकडे उपचार करत असताना अर्थचक्र पूर्णपणे थांबणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर आदिंकडून याबाबत सातत्याने पर्याय सुचविले जात आहेत, पण त्यांनी पर्याय सुचविले किंवा लॉकडाउन करू नका, असे म्हटले की, राजकारण केल्याचा आरोप केला जातो. पण लॉकडाउन किती काळ करणार, कधी सगळे पूर्ववत होणार, हे सरकारकडून कुणीही स्पष्ट सांगू शकत नाही. महाराष्ट्रातील शिक्षणाचाही पुरता बोजवारा उडाला आहे. पूर्ण लॉकडाउन करण्यात आले तर शिक्षणक्षेत्रच पुरते उद्ध्वस्त होणार आहे. या परिस्थितीत विद्यार्थी, पालक यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात सूट देता येईल तिथे तो पर्याय उपयोगात आणता येईल, पण जिथे परीक्षा गरजेच्या आहेत तिथे त्या घ्यायलाच हव्यात. त्यासाठी मार्ग काढावाच लागेल. अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. आणखी एक वर्ष वाया जाणे उचित ठरणार नाही. आज महाराष्ट्रात परराज्यातून आलेले कामगार, कष्टकरी पुन्हा एकदा आपापल्या गावाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे इथे पुन्हा एकदा कामगारांची कमतरता भासणार आहे. स्वाभाविकच आर्थिक घडी विस्कटणार आहे. या सगळ्यांचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर उपाय सुचवा असे आवाहन केले होते. लॉकडाउनऐवजी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने रोज सकाळी १० ते १ या वेळेतच उघडू दिली तरी गर्दी कमी होईल आणि या लोकांचा व्यवसाय बुडणार नाही. नाट्यगृह, चित्रपटगृहे यांनाही ठराविक सवलती देणे आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्बंध घालणे गरजेचे आहे. आज नेमके काय सुरू आहे, काय बंद आहे, याची लोकांना कल्पनाच नसल्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी लोक धावाधाव करत आहेत. करोनासोबत जगायला आता शिकलेच पाहिजे. वाटेल तेव्हा लॉकडाउन लावून अर्थचक्राला खीळ घालणे आता परवडणारे नाही. लॉकडाउन लावला की आपण मोकळे असा पवित्रा सरकारने घेता कामा नये. म्हणूनच लॉकडाउन लावायचा असेल तर लोकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या, अशी मागणी होत आहे. लॉकडाउन लागला तर ती मदत प्रत्येक गरजवंताला मिळाली पाहिजे. त्याबद्दल ठाकरे सरकार कोणतीही घोषणा करत नाही किंवा आश्वासन देत नाही. मग लॉकडाउन लावून सर्वसामान्यांच्या हालात फक्त भर घालण्याचा विचार का केला जात आहे? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा