24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

Google News Follow

Related

यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. लोक ऐकत नाहीत मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील दोन दिवस सुद्धा प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलता अस्लम शेख यांनी व्यक्त केली.

“गेल्या दोन महिन्यांपासून आपण जे प्रतिबंध लावले आहेत, त्याबाबत मी किंवा मंत्री आणि मुख्यमंत्री स्वत: लोकांना आवाहन करुन मास्क लावण्यासाठी, गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. निर्बंध लावत लावत आता आपण इथवर पोहोचलो आहोत. आणखी किती निर्बंध लावायचे आहेत? आता हा शेवटचा टप्पा आला आहे. आणखी किती कठोर बनायचं? ती मान्यताही संपली आहे. आता शेवटचा प्रयत्न करणार. मुंबईत लॉकडाऊन लावण्याची सरकारची आणि माझी स्वत:ची मानसिकता नाही. पण जर लोकांच्या जीवाचा प्रश्न आला की आमच्याकडे पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहोत. मी आज, उद्या दररोज मार्केटमध्ये जाऊन निवेदन देणार. शेवटपर्यंत प्रयत्न करु, लोकांना आवाहन करु आम्हाला मजबूर करु नका असं आवाहन करणार आहे.” असं अस्लम शेख म्हणाले.

हे ही वाचा:

‘कू’ ला सिलीकॉन व्हॅलीतून आर्थिक बळ

‘सेक्युलर’ येल प्राध्यापकाचा मोदीद्वेष उघड

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

सेक्युलारिजम आणि कम्युनालिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कालच दुसरा पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला होता. कुणाकडे दुसरा पर्याय असेल तर तो सांगा, अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर आता अस्लम शेख यांनीही मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईत आता कधीही लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा