औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा

औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा

औरंगाबादमध्ये संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात येणार होता. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री १० वाजता केली होती.

औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी विरोध दर्शवला होता. त्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचा:

राज्यात कोरोनाचा थयथयाट, पण ठाकरे सरकार स्मारक उभारण्यात मग्न

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधी, लोक यांच्या सूचना आणि शासनाचे निर्देश यानुसार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येतो. लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार स्वतंत्र सर्वसमावेशक धोरण आणणार आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन रद्द केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याबरोबरच खासदारांनी पुकारलेल्या मोर्चात गर्दी गोळा झाल्यास मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आल्याने जिल्हाप्रशासनाने एक पाऊल मागे घेतल्याचे देखील बोलले जात आहे.

यामुळे औरंगाबाद मध्ये छोटी-मोठी दुकाने सुरू राहणार आहेत. त्याबरोबर लग्न समारंभांना देखील नियमात राहून परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान हा लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर, इम्तियाज जलील यांची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

Exit mobile version