नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास ५०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस काल संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

यानुसार आज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ असा १२ तास कळंबोली ते बेलापुर आणि वाशी ते बेलापूर रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय हलक्या वाहनाच्या वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय

कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

तसेच कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version