दिल्लीतील हज हाऊसला स्थानिकांचा विरोध

दिल्लीतील हज हाऊसला स्थानिकांचा विरोध

दिल्लीच्या द्वारका सेक्टर २२ मध्ये उभ्या राहत असलेल्या हज हाऊसला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने, त्या ठिकाणी हज हाऊस उभारण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोडून द्यावा लागला आहे.

दिल्लीच्या द्वारका सेक्टर २२ मध्ये हज हाऊस उभारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र तेथील ३६० खाप पंचायतींनी विरोध केला होता. दिल्ली भाजपाचे प्रभारी आदेश गुप्ता यांनी यावेळी या भागात शाळा, रुग्णालये आणि महाविद्यालये यांच्या कमतरतेकडे देखील लक्ष वेधले. राजकीय फायद्यासाठी एका विशिष्ट समाजाला पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले की द्वारका सेक्टर २२ मध्ये उभे राहणारे हज हाऊस स्थानिकांच्या आणि तेथील ३६० खाप पंचायतींच्या शिवाय या भागातील ग्रामीण लोकांच्या संपूर्ण मर्जीविरूद्ध उभे राहणार होते.

हे ही वाचा:

नव्या युतीच्या फुसकुल्या

कळवा येथे घरांवर कोसळली दरड

जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी

धक्कादायक! गर्भपिशव्या काढण्याचा इथे सुरू आहे धंदा

यावेळी बोलताना आदेश गुप्ता यांनी सांगितले की, खरे दिल्लीकर हे ग्रामीण भागात राहतात आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विरूद्ध जाण्याचा प्रयत्न करू नये. “ज्या भागात हज हाऊस उभे राहणार होते त्या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम राहत नाहीत. जे थोडेफार राहतात, त्यांना रुग्णालय किंवा शाळा किंवा महाविद्यालय हवे आहे” असे त्यांनी बोलताना सांगितले.

आदेश गुप्ता असे देखील म्हणाले की दिल्ली वक्फ बोर्डाच्या मालकीचे जमिनीचे अनेक तुकडे राष्ट्रीय राजधानी परिसरात आहेत आणि त्यापैकी एखाद्या पट्ट्यावर हज हाऊसची निर्मिती केली जाऊ शकते. दिल्ली भाजपाने द्वारका सेक्टर २२ मध्ये कोणत्याही परिस्थितीत हज हाऊस निर्माण होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला.

Exit mobile version