बृहन्मुंबई महानगर पालिका एकीकडे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभा करण्याच्या तयारीत असली तरी, स्थानिकांनी मात्र याला विरोध केला आहे. कोलाब्याच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात असा पुतळा उभारण्याला विरोध करत, स्थानिकांनी आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे आक्षेप नोंदवले. अशा कोणत्याही पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी देऊ नये अशी विनंतीही स्थानिकांनी आयुक्तांकडे केली.
निवृत्त व्हाईस ऍडमिरल आयसी. राव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी २०१३ च्या निकालाचा दाखल देत निवतकरांनी अशा अनावरणाला परवानगी नाकारावी असे सांगितले. २०१३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज्य सरकार कोणत्याही रस्त्यांवर अथवा पादचारी मार्गांवर कोणाचाही पुतळा किंवा स्मारक बंधू शकत नाही. “या संदर्भातली माहिती आम्ही आधीच संयुक्त पोलीस महासचिवांकडे दिली होती” असे आपली मुंबई या एनजीओचे अध्यक्ष असलेल्या राव यांनी सांगितले.
“या प्रकरणावर शिवसेनेने मात्र कोणीही मुंबईकर कधीच बाळासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करणार नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर शिवसेना कोलाब्याच्या या स्थानिकांना मुंबईकर मानत नाही का? असा प्रश्न लोकांच्या मनात उद्धबवतो.
महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून ठिकठिकाणी नावं बदलून बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जात आहे. तर ठिकठिकाणी पुतळे बांधले जात आहेत. नवी मुंबई विमानतळालादेखील बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी सेनेने केली आहे.