विनाशकारी भूकंपात ढिगाऱ्याखाली जिवंत सापडला छोटा मुलगा…

२२ तासांनी काढले सुखरूप बाहेर

विनाशकारी भूकंपात ढिगाऱ्याखाली जिवंत सापडला छोटा मुलगा…

‘देव तरी त्याला कोण मारी’ असं आपल्याकडे म्हंटले जात पण, याचाच प्रत्यय तुर्की येथे झालेल्या भूकंपाच्या ठिकाणी लोकांनी अनुभवला. परवा झालेल्या विध्वंसकारी भूकंपामुळे पूर्ण जग हळहळ व्यक्त करत आहे. पण या विनाशकारी भूकंपामधून आश्च्यर्यकारक रित्या एक तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे आणि सध्या त्याचा १९ सेकंदाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्यला त्याचे  रेस्क्यू ऑपरेशन केल्याचे दिसत आहे. तुर्की सिरीयात आत्तापर्यंत आठ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून ३८००० हजार नागरिक जखमी झाले आहेत.

या भूकंपामुळे तब्बल पाच हजार नागरिकांचा तुर्की मध्ये तर दोन हजार नागरिकांचा सिरीयात मृत्यू झाला आहे. बचाव कार्य सुरु असून भारताकडून तुर्कीमध्ये पाच विमाने मदतकार्यासह दाखल झाली आहेत. या भूकंपाच्या मदत्कार्याचे अनेक व्हिडिओ बघायला मिळत आहेत यात मोठ्या ढिगाऱयाखाली एक तीन वर्षाचा चिमुरडा त्यातून सुखरूप बचावला असल्याचे आपण बघू शकतो. या चिमुकल्याचे नाव मिरान असून तब्बल २२ तासांनंतर त्याला ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश मिळाले आहे. १९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये त्याला वाचवल्यावर सगळे देवाचे आभार मानताना आपण बघू शकतो.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

तुर्कीत बचाव कार्य सुरु असताना धुळीने माखलेला काहीसा भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या चिमुकल्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याला एवढ्या मोठ्या ढिगाऱ्यातून काढून सुद्धा त्याला गंभीर दुखापत झालेली नव्हती.

स्थानिक रिपोर्टनुसार ही घटना तुर्कीमधील माल्ट्या येथे घडली आहे. दरम्यान अवघे जग तुर्की आणि आजुबाजुच्या देशांसाठी प्राथर्ना करत आहे.या विनाशकारी भूकंपाचे विविध व्हिडिओ बघून सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. हा बचावकार्याचा व्हिडिओ बघून सर्व नेटकरी बचाव पथकाच्या जवानांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच चिमुकल्याला वाचवल्याबद्दलआभार मानत आहेत. हा व्हिडिओ बघून तुम्हीही म्हणाल ‘देव तारी त्याला कोण मारी’.

 

Exit mobile version