एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

भाजपाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध

एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले असून या निवडणुकीच्या टप्प्यांना १९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाने आपल्या नेतृत्वात एनडीएकडून ‘अब की पार ४०० पार’चा नारा दिला आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशातचं भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातून या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात महायुती सरकारने ४५ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे.

राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. केंद्रीय मंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांचाही या यादीत समावेश आहे. यातील काही महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते इतर राज्यांमध्ये जाऊनही पक्षाच्या मोर्चेबांधणीमध्ये सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील भाजपाचे स्टार प्रचारक

  1. जे पी नड्डा
  2. नरेंद्र मोदी
  3. अमित शाह
  4. राजनाथ सिंह
  5. योगी आदित्यनाथ
  6. नितिन गडकरी
  7. देवेंद्र फडणवीस
  8. भूपेन्द्रभाई पटेल
  9. प्रमोद सावंत
  10. डॉ. मोहन यादव
  11. विष्णु देव साई
  12. भजन लाल शर्मा
  13. एकनाथ शिंदे
  14. रामदास आठवले
  15. अजित पवार
  16. नारायण राणे
  17. अनुराग ठाकुर
  18. ज्योदिरादित्य सिन्धिया
  19. स्मृति ईरानी
  20. रावसाहेब दानवे पाटिल
  21. शिवराज सिंह चौहान
  22. सम्राट चौधरी
  23. अशोक चव्हाण
  24. विनोद तावडे
  25. चंद्रशेखर बावनकुळे
  26. आशिष शेलार
  27. पंकजा मुंडे
  28. चंद्रकांत पाटील
  29. सुधीर मुनगंटीवार
  30. राधाकृष्ण विखे पाटिल
  31. पीयूष गोयल
  32. गिरीश महाजन
  33. रवींद्र चव्हाण
  34. के. अन्नामलाई
  35. मनोज तिवारी
  36. रवि किशन
  37. अमर साबळे
  38. डॉ. विजयकुमार गावित
  39. अतुल सावे
  40. धनंजय महाडिक

हे ही वाचा:

लोकसभेच्या रिंगणात राजू शेट्टींनी ‘माविआ’ची साथ सोडली

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

स्टार प्रचारक म्हणजे काय?

स्टार प्रचारक म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या रॅलीमुळे आणि त्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. यामुळे जास्तीत जास्त मतं आपल्या खात्यात येण्याची शक्यता असते. स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चातून न करता त्यांचा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही याचा अंतिम निर्णय संबंधित पक्षाचा असतो.

Exit mobile version