ठाकरे गटाकडून खैरे यांना उमेदवारी दानवेंना तिकीट नाही

ठाकरे गटाची १७ उमेदवारांची यादी जाहीर

ठाकरे गटाकडून खैरे यांना उमेदवारी दानवेंना तिकीट नाही

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले असून याचं पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची यादी करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा मुद्दा मार्गी न लागल्याच्या चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाने आपल्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी मिळाली आहे. छ. संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगतीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर, रायगडमधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“राहुल गांधींची यात्रा जिथे जिथे केली तिथे काँग्रेस फुटली”

“कुंभकर्ण म्हणेल, मी सहा महिने झोपायचो काँग्रेसवाले वर्षभर झोपतात”

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

मुंबईच्या ईशान्य लोकसभा मतदार संघातून संजय दिना पाटील यांना संधी देण्यात आली असून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत आणि मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग- रत्नागिरी येथून विनायक राऊत हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांना धाराशिवमधून संधी देण्यात आली आहे. मावळमधून संजोग वाघेरे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. तर, राजाभाऊ वाझे यांना नाशिकमधून संधी देण्यात आली आहे. यवतमाळमधून संजय देशमुख तर, हिंगोलीमधून नागेश अष्टीकर हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा येथून संधी देण्यात आली आहे.

Exit mobile version