गेले कित्येक दिवस विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी कुठे आहे यावरून तर्कवितर्क सुरू होते. अखेर ही यादी राज्यपालांकडे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ज्यांची नावे मान्य केली होती आणि विधानपरिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना मंजुरीसाठी पाठविलेल्या १२ सदस्यांची यादी राज्यपाल सचिवालयात नसून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आहे. राजभवन सचिवालयात अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या आव्हान अपिलावरील सुनावणीत ही बाब समोर आली आहे.
प्रथम अपील अनिल गलगली यांनी दाखल केले होते. राज्यपालांचे उपसचिव प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत अनिल गलगली म्हणाले की यादी उपलब्ध नाही, मग ही यादी कोणाकडे उपलब्ध आहे? प्राची जांभेकर यावर म्हणाल्या की, राज्यपालांकडे यादीसह संपूर्ण फाइल आहे आणि जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा माहिती उपलब्ध होईल. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर अधिक काही बोलू शकत नाही.
हे ही वाचा:
एरिक्सन पुन्हा उभा राहतोय! चाहत्यांचे मानले आभार
शासकीय कर्मचारी होणार रिक्षावाले?
…तर आषाढी एकादशीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही
अँटालिया प्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २२ एप्रिल २०२१ रोजी राज्यपालांच्या सचिवालयाकडे अशी माहिती मागितली होती की, विधानपरिषदेतील सदस्यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री / मुख्यमंत्री सचिवालय यांनी राज्यपालांना दिलेली यादी राज्यपालांकडे सोपवावी. राज्यपालांनी नेमलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यांसह मुख्यमंत्री / मुख्यमंत्री सचिवालय यांनी राज्यपालांना नियुक्तीसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती १९ मे २०२१ रोजी अनिल गलगली यांच्या अर्जावर उत्तर देताना राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी म्हणाले की, राज्यपाल यांनी नियुक्त केलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यांची यादी सार्वजनिक माहिती अधिकारी (प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही.