उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्ण जन्माच्या दिवशी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी असलेल्या मथुरामध्ये त्यांनी दारू आणि मांस विक्रीवर बंदी घातली आहे. सोमवार, ३० ऑगस्ट रोजी मथुरा येथे आयोजित कृष्ण जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे.
मथुरा येथील अनेक साधुसंतांनी पवित्र अशा श्रीकृष्ण जन्मभूमीवर दारू आणि मांस विक्री केली जाऊ नये अशी मागणी केली होती. या मागणी नंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे असे आदित्यनाथ यांनी सांगितले. यासंबंधी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले आहेत ही दारू आणि मांस विक्रीच्या व्यवसायात असणाऱ्या मथुरावासी यांसाठी नव्या रोजगारांची सुविधा करण्यात यावी.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
तब्बल २३ वर्षांनी पाकिस्तानातून तो परतला आणि…
तर यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी असेही सांगितले की जे दारू आणि मांस विक्रीच्या व्यवसायात होते ते दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा विचार करू शकतात. ज्यामुळे मथुराचे जुने वैभव पुनरुज्जीवित होईल. मथुरा हे मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होते.
दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर सोशल मीडियावर बहुतांशी प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटणे दिसत आहेत. तर काहीजण या निर्णयाच्या विरोधातही भाष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे राजकारण तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.