चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली

चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारकडून राज्यातील इतर जनतेला दिलासा देणारा कोणता निर्णय झाला याबद्दल संभ्रम असतानाच चंद्रपूर मधील तळीरामांसासाठी मात्र ठाकरे सरकारने एक खुशखबर दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारू बंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन लागलेला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांचे कंबरडे मोडलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय ठाकरे सरकारकडून क्वचितच घेतले जात आहेत. गुरुवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर मधील दारूबंदी हटवण्याचा निर्णय मात्र तत्परतेने ठाकरे सरकारने घेतला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे अपरिपक्व

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे गेल्या काही काळापासून चंद्रपूर मधील दारूबंदी हटवण्यासाठी ना केवळ आग्रही होते, तर जोरदार प्रयत्न देखील करत होते. दारूबंदी नंतर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती आणि दारूबंदी उठवावी यासाठी अडीच हजार निवेदने प्राप्त झाली होती असे सांगत वडेट्टीवार दारूबंदी उठवण्याचे जोरदार समर्थन करत होते. त्यांच्या या मागणीला ठाकरे सरकारने हिरवा कंदील दाखवून चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी निर्णय घेताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांच्या पासून ते चंद्रपूर मधील स्थानिक नागरिकांचा विरोध ठाकरे सरकारने पूर्णपणे झुगारून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रात कार्यरत असताना चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.

Exit mobile version