फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा

Lilavati Hospital, Mumbai. *** Local Caption *** Lilavati Hospital, Mumbai. express photo

खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यावर त्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना एमआरआय चाचणीदरम्यान त्यांच्या काढलेल्या फोटोचा फटका मात्र रुग्णालयातले सुरक्षा अधिकारी पराग जोशी यांना बसला आहे. पराग जोशी यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याबद्दल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

सोमय्या यांनी लिलावती रुग्णालयाचे चेअरमन यांना पत्र लिहून ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुरक्षा अधिकारी असलेल्या पराग जोशी यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय कठोर आणि दुर्दैवी आहे. एमआरआय विभागात फोटो काढणे हा गंभीर मुद्दा असेल पण त्यासाठी एखाद्याला नोकरीवरूनच काढून टाकणे हे योग्य नाही. पराग जोशी हे २००७पासून रुग्णालयाच्या सेवेत आहेत, अशा ज्येष्ठ व्यक्तीला नोकरीतून त्वरित बडतर्फ करणे अन्यायकारक आहे.

सोमय्या यांनी म्हटले आहे की, पालिका, शिवसेनेचे नेते, रुग्णालय व्यवस्थापन यांना त्यावेळची परिस्थिती काय होती, हे चांगले ठाऊक आहे. ज्याने हे छायाचित्र घेतले, ते व्हायरल कुणी केले हे बघता एखाद्याला नोकरीवरून काढून टाकणे हे न्याय्य नाही. मी मंत्रालयात गेलेलो असताना शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी माझे फोटो काढले होते. त्यांनी ते सोशल मीडियावर टाकले, ते अनधिकृत होते. झेड सुरक्षेत असलेल्या व्यक्तीचे असे फोटो काढणे नियमबाह्य होते. पण त्यावेळी प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी विनंती.

याबाबत पराग जोशी यांच्या पत्नी शीतल जोशी यांनीही रुग्णालय व्यवस्थापनाला पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेकडून आलेला दबाव आणि ९ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर माझे पती पराग यांना लिलावती रुग्णालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना पाच दिवस निलंबित करण्यात आले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

 

आम्ही १४ मे रोजी आमचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. पण त्यानंतर त्यांनी माझ्या पतींना १७ मे रोजी नोकरीतूनच काढून टाकले. २००७पासून ते लिलावती रुग्णालयाच्या सेवेत होते. गेली १४ वर्षे त्यांनी लिलावती रुग्णालयात सेवा केली. आम्हाला जो मानसिक त्रास यामुळे झाला आहे तो दुर्दैवी आहे. आपण यासंदर्भात लक्ष घालावे ही विनंती.

शिवसेनेने आतापर्यंत अनेक मराठी माणसांना नोकऱ्या दिल्या, नोकरीतील मराठी माणसाच्या अधिकारांचे रक्षण करण्याची भूमिका घेतली पण यावेळी त्यांनी एका मराठी माणसाची नोकरीच घालवली, अशी भावना आता रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 

 

Exit mobile version