हुरियतचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला एनआयए न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगच्या गुन्ह्यासाठी यासिन मलिकला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यासोबतच यासिन मलिक याला दहा लाखाचा दंडही ठोठविण्यात आला आहे.
यासिन मलिक याला मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणी केंद्रिय तपास यंत्रणा अर्थात एनआयए मार्फत करण्यात आली होती. यासिन मलिक याला न्यायालयाने दहशतवादाला आर्थिक पाठबळ देण्याच्या आरोपात दोषी मानले आहे. यासिन मलिकने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी करार दिला.
हे ही वाचा:
यासिन मलिकला फाशी द्या – एनआयए
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले
तेव्हापासूनच यासिन मलिकला काय शिक्षा होणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसली. केंद्रीय तपास संस्थेनी यासिन मलिकला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. पण असे असले तरी न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही आणि यासिन मलिकला जन्मठेप सुनावली आहे.
दरम्यान न्यायालयात आपल्या शिक्षेबाबत यासिन मलिकने कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितले होते. एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केल्यानंतर तो जवळपास दहा मिनिटं कोर्टात शांत राहिला. त्यानंतर त्यांने कोर्टाला सांगितले की मला जेव्हा सांगण्यात आले तेव्हा मी समर्पण केले. बाकी निर्णय मी कोर्टावर सोडतो. त्यांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे. त्यानंतर कोर्टाने निकाल देताना त्याला जन्मठेप सुनावली.