पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश

पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश

दिल्लीतून शरद पवार यांनी देखील एक पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव केला आहे. या परिषदेत त्यांनी दावाच खोटा, तर चौकशी कसली असा सवाल देखील केला आहे.

राज्यातील राजकिय परिस्थितीमुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. त्यावर मुळात हा दावाच खोटा असल्याने चौकशी कसली असा सवाल देखील त्यांनी सांगितले. त्याबरोबरच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?

राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा

राज्यात आज बैठकांचा सिलसिला

शरद पवार यांनी यावेळी सांगितले की वाझे- देशमुख भेट झालीच नाही. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या काळात कोरोनामुळे अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात होते. पत्रात उल्लेख केलेल्या दिवशीदेखील ते क्वारंटाईन होते असा दावा पवारांनी केला.

यावेळी बोलताना मुख्य केस अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीची आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत असे देखील शरद पवार यांनी सांगितले. त्याबरोबरच अनिल देशमुखांच्या पत्रकार परिषदेच्या ट्वीटवरून छेडले असता त्यावर स्पष्ट उत्तर देणे पवारांनी टाळले.

देवेंद्र फडणविस यांनी शरद पवारांची पत्रकार परिषद संपायच्या आतच पवार यांचा दावा कसा चुकीचा आहे, हे दाखवणारे ट्वीट केले. १५ फेब्रुवारी रोजीच अनिल देशमुख यांनी त्यांची पत्रकार परिषद ट्वीट केली होती. फडणवीसांनी हे ट्वीट रीट्वीट केले. त्यामुळे १५ तारखेला गृहमंत्री गृह विलगीकरणात असल्याचा दावा खोटा ठरला आहे. याच व्हिडिओचा आधार घेत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पवारांना लक्ष्य केले. जर गृहमंत्र्यांना कोरोना होता हा पवार साहेबांचा दावा असेल तर, पोलिसांनी तात्काळ कोरोनाच्या कायद्यांतर्गत अटक करावी. कारण कोरोना असताना पत्रकार परिषद घेऊन कोरोनाप्रसार केल्याप्रकरणी अटक करण्यात यावी.

Exit mobile version