सायनावर अश्लिल टिप्पणी करूनही अभिनेता सिद्धार्थला पुरोगाम्यांचे अभय

सायनावर अश्लिल टिप्पणी करूनही अभिनेता सिद्धार्थला पुरोगाम्यांचे अभय

चित्रपट अभिनेता सिद्धार्थ याने भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबद्दल केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले असून सिद्धार्थवर सगळीकडून टीकेचे आसूड ओढले जात आहेत. मात्र यावर तथाकथित पुरोगामी आणि लिबरल मंडळी मूग गिळून गप्प आहेत. एरवी महिलांच्या प्रश्नांवर उसळून वर येणाऱ्या या मंडळींनी सायनाची बाजू घेतलेली नाही. त्याबद्दल सोशल मीडियावर या मंडळींवर ताशेरे ओढले जात आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यात गाड्यांचा ताफा अडविण्यात आला होता. त्यावरून त्यांच्या सुरक्षेत पंजाब सरकारने दाखविलेल्या हलगर्जीपणावर जोरदार टीका झाली. त्याबाबत सायनाने ट्विट करत पंतप्रधानांसारख्या व्यक्तीच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल दिरंगाई दाखविली जात असल्याबद्दल टीका केली. पण अभिनेता सिद्धार्थ याला सायनाने मोदींची बाजू घेणे पसंत पडले नसावे. त्याने ट्विट करत तिला कमरेखालील शब्दांचा वापर करत हिणविण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत कालवश

भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

निवडणुकांत शिवसेनेला सोबत न घेण्याचा ‘राष्ट्रवादी’ प्रयोग!

कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

 

विशेष म्हणजे एरवी महिलांच्या सबलीकरणाबद्दल बोलणाऱ्या सिद्धार्थला सायना ही महिला असल्याचा विसर पडला. त्याने तिच्यावर टीका करताना आपली पातळी सोडली. त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर आपल्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता अशी नरमाईची भाषा वापरावी लागली. पण यावर डाव्या, लिबरल मंडळींनी सिद्धार्थवर टीका केली नाही. कारण त्याने मोदींची बाजू घेणाऱ्या सायनाला टोकण्याचा प्रयत्न केला होता.

पुरोगामी म्हणवणाऱ्या कन्हय्याकुमारनेही मध्यंतरी एका मुलाखतीत अशाच भाषेचा वापर केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न त्याला विचारल्यावर तो म्हणाला होता की, असे प्रश्न मला विचारत जाऊ नका. कारण भारतातील प्रत्येक तरुणाची जी इच्छा आहे अगदी तशीच माझीही आहे. माझ्या वयाचा विचार करून मला प्रश्न विचारा. पण हाच कन्हय्या आता काँग्रेसचा सदस्य आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात फारसा टिकेचा सूर दिसला नाही.

Exit mobile version