वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सचिन वाझेच्या पत्रापासून ते रेमडेसिवियर औषध, लसींचा पुरवठा, सरकट टाळेबंदी या बाबत त्यांनी मत व्यक्त केले.

वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

सचिन वाझे याने एका पत्रातून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना हे पत्र अतिशय गंभीर असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले होते.

“वाझेचे पत्र गंभीर असून विचार कराययला लावणारे आहे. पोलिसांच्या प्रतिमेसाठी हे काही चांगले लक्षण नाही. याची सखोल चौकशी होऊन दुध का दुध पानी का पानी व्हायला पाहिजे असे ते म्हणाले. त्याबरोबरच याची चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी, जेवढा उशीर होईल तेवढी डागाळत गेलेली प्रतिमा नीट होणे अशक्य होईल.” असे त्यांनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा:

मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी वाझे याचे एक कथित पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला उद्देशून वाझेने हा पत्ररूपी जबाब दिला आहे.

त्याबरोबरच त्यांनी यावेळी लसींवरून चाललेले राजकारण, रेमडेसिविअरचा काळाबाजार याबाबत सुद्धा त्यांनी सरकारला सुनावले. ठाकरे सरकारने केलेल्या सरसकट लॉकडाऊन वर देखील त्यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे.

Exit mobile version