खालिस्तानवादी संघटना, ‘सिख्स फॉर जस्टिस’चे मुख्य गुरूपातवंत सिंग पन्नू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा करावी असे सांगितले आहे.
हे ही वाचा:
पन्नू म्हणाले की बंगाल आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी, भारताच्या वर्चस्ववादापासून बंगाली आणि मराठीच्या सांस्कृतिक तसेच भाषिक स्वातंत्र्यासाठी दोन्ही राज्यांनी एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा करावी.
खालिस्तान समर्थकाने अशीही बाष्कळ बडबड केली आहे, की उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी लोकनियुक्त मुख्यमंत्री असल्याने, ते दोन्ही राज्यांच्या एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा करू शकतात. इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या गोष्टीलाही पाठिंबा दिला जाऊ शकतो.
आपल्या बडबडीत पुढे असंही म्हटलेलं आहे, की भारताच्या महाराष्ट्र आणि बंगाल विरोधातील धोरणांमुळे महाराष्ट्रातील आणि बंगालमधील शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या केल्या जात आहेत.
पन्नू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील राज्ये भारतापासून स्वतंत्र घोषित करण्यासाठी पटवून देताना, त्यांना मुख्यमंत्री आहात ते महाराष्ट्र आणि बंगालचे पहिले पंतप्रधान व्हाल आणि इतिहासात तुमची नोंदही घेतली जाईल, असे गाजरही दाखवले आहे. यानंतर शेवटी, मुख्यमंत्र्यांनी असे पाऊल उचलल्यास त्याला सिख फॉर जस्टिसतर्फे पाठिंबा देण्यात येई असेही सांगितले आहे.