पाहा, उपमुख्य अभियंता काय करतोय? अमित साटम यांचे पत्र

पाहा, उपमुख्य अभियंता काय करतोय? अमित साटम यांचे पत्र

उपमुख्य अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी

भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहले आहे. काल एक व्हिडीओ प्रसारित झाला त्या संदर्भात अमित साटम यांनी पत्र लिहले आहे. त्या पत्रात साटम यांनी उपमुख्य अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

काल प्रसारित झालेल्या व्हिडिओचा संदर्भ घेत अमित साटम यांनी पत्रात लिहले की, काल एक व्हिडीओ प्रसारित झाले, ज्यात रस्ते विभागाचे उपमुख्य अभियंता कामत हे बीएमसी रस्ते विभाग कार्यालयात रात्री ११ वाजता रस्ते कंत्राटदारांसोबत बसून रस्त्यांच्या निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया करताना दिसत आहेत. हा चुकीचा हेतू, भ्रष्टाचार, कायदेशीर प्रक्रियेत फेरफार करणे. अंतिम टप्प्यात प्रक्रियेत इच्छुक पक्षांचा समावेश करणे आणि त्यांना प्रक्रियेसाठी गोपनीय बनवणे जेणेकरुन ते हाताळू शकतील. अधिकारी-कंत्राटदार संगनमताने मुंबई शहराला चांगले रस्ते मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे अमित साटम यांनी उपमुख्य अभियंता तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल

धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत

मी तुम्हाला विनंती करतो की, थोडी ताकद, सचोटी आणि पारदर्शकता दाखवा आणि संबंधित उप मुख्य अभियंता तात्काळ निलंबित करा, चौकशी सुरू करा आणि त्याबद्दल स्थानिक पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवला आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल मला माहिती द्या, असे पत्रात अमित साटम यांनी लिहले आहे.

Exit mobile version