लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटनुसार, महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच ‘बेस्ट सीएम’, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले होते.

हे ही वाचा:

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी

अनिल देशमुख, १०० कोटी प्रकरणात, ईडीकडून पाच बारमालकांची चौकशी

शिवसेनेचा ‘हा’ मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट?

मुंबई लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. १५ दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. राज्यातील १४ जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं होतं.

Exit mobile version