“माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा, मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा,मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.#जय_मल्हार@VijayWadettiwar @INCMaharashtra pic.twitter.com/6JeTERQg1U
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 7, 2021
खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ५० कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काल पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईन. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर ५० कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असे खुले आवाहन पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.
हे ही वाचा:
मोदी एक्स्प्रेसमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर
मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले
… तर जावेद अख्तरना शबानासोबत पानाची टपरी लावावी लागली असती
जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन
पडळकरांनी वडेट्टीवारांवर घणाघाती आरोप केले होते. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहेत. तसेच दारुच्या व्यवसायात त्यांची भागिदारी आहे, असे आरोप पडळकर यांनी केले होते. त्यामुळे वडेट्टीवार प्रचंड संतापले होते.