महाविकास आघाडी सरकारमध्ये जनकल्याणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी असून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिवसेनेला सर्वात कमी निधी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये जनकल्याणासाठी सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी पक्षाने केला या पक्षाकडे असलेल्या ११ खात्यांना २०२०- २०२१ या आर्थिक वर्षात २ लाख ५० हजार ३८८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या निधीतील २ लाख २५ हजार ४६१ कोटी लोककल्याणाच्या कामावर खर्च करण्यात आले आहेत.
काँग्रेसने तब्बल १ लाख २१ हजार १४ कोटींचे अनुदान मंजूर करून घेतले असून त्यातील १ लाख १ हजार ७६८ कोटींचा निधी खर्च करण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्री आणि सर्वाधिक आमदार असलेल्या शिवसेनेला ६६ हजार २८९ कोटींची रक्कम मंजूर केली होती. शिवसेनेने केवळ ५४ हजार ३४३ कोटींची रक्कम खात्यांवर खर्च केली आहे. तीनही पक्षातील शिवसेनेला सर्वाधिक कमी निधी मिळाला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक
‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा
शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून दोन अर्थसंकल्प पारित झाले आणि ४ वेळा पुरवणी मागण्या मंजूर केल्या गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आरोग्य खात्याला अधिक रक्कम मिळाली आहे.