27 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरराजकारणनवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

विरोधी आमदार शनिवारी शपथ घेणार नसल्याचा निर्णय

Google News Follow

Related

राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ पार पडली असून याचा निकालही स्पष्ट झाला आहे. जनमताचे कौल महायुतीला मिळाले असून महायुतीने बहुमताचा आकडा गाठला. यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. यानंतर त्यांनी शपथविधीसाठी निमंत्रण देताच ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत बोलावण्यात आले असून विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. सकाळी ११.३० वाजता आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. ९ डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार असून तोवर हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे कामकाज पाहणार आहेत. कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या सभापतींची देखील निवड केली जाणार आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून सध्या तीन मंत्र्यांचे सरकार आता कामाला लागले आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, आमदारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृह नेते या नात्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.

हे ही वाचा:

“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

मसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांकडून आज शपथ घेतली जाणार नाही. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले आणि थेट विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात त्यांना अभिवादन केलं. भास्कर जाधव यांनी याबाबत म्हटलं की आमचा शपथेला विरोध नाही. आमचा या सरकारला पाशवी बहुमत मिळालं आहे, जवळपास ९० टक्के बहुमत मिळालं आहे, हे देशात यापूर्वी कधी घडलेलं नाही. ही जादू इव्हीएमची आहे. सरकारचा निषेध करुन आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाय,असं भास्कर जाधव म्हणाले. ईव्हीएमचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा