डेहराडूनला निघून जाणं हीच ठाकरेंची मराठा आरक्षणाची काळजी का?

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

डेहराडूनला निघून जाणं हीच ठाकरेंची मराठा आरक्षणाची काळजी का?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता डेहराडूनला रवाना झाल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी एक्सवर (ट्विटर) ट्वीटद्वारे केला आहे. हा दावा करतानाच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. पक्षाच्या कामासाठी ते गेले असताना त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता⁰ यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल विचारला आहे.

ठाकरे कुटुंब काल दुपारी १ वाजता डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही का? असा सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता या मुद्द्यावरून डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला प्रकरणात अटकेची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

“ज्या व्यक्तीने राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला त्या व्यक्तीचा टॅग डोक्यावर लावून घेण्यास हरकत नाही”

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ

मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!

तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियाने हीने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे.

Exit mobile version