27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणमोबाईलमुळे ईव्हीएम हॅक होते हे सिध्द करून दाखवा

मोबाईलमुळे ईव्हीएम हॅक होते हे सिध्द करून दाखवा

रवींद्र वायाकारांचे ठाकरे गटाला आव्हान

Google News Follow

Related

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील निकालावरून आरोप प्रत्यारोप होत असून शिवसेना खासदार रवींद्र वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये, असं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे. रवींद्र वायकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते.

“खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही. तुम्ही पराजय मोठेपणाने पचवायला शिकलं पाहिजे. मी पराभूत झाल्यावरही अमोल कीर्तिकर यांना सॉरी म्हटलं. मला कुणाला दुखवायचं नाही. पण मला टार्गेट केलं जात आहे. साडे चार लाख लोकांनी मतदान केलं आणि कायदेशीर निवडून दिलंय. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या करा. त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण उगाच माझी बदनामी करू नका. माझ्या विरोधात निगेटिव्हिटी करण्यात आली आहे. त्यांना मुलाला विधानसभेला उभं करायचं असेल. त्यामुळे माझी बदनामी करण्यात येत आहे,” अशी सणसणीत टीका रवींद्र वायकर यांनी केली आहे.

“ईव्हीएम मशीन हॅक झाली असती तर भाजपाला आणखी जागा मिळाल्या असत्या. ४०० पारचा नारा त्यांनी दिलेला होता त्यामुळे त्यांना असं काही करता आलं नसतं का? मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध केलं तर देश नाही जगातही कळेल असं काही होतं म्हणून. आरोप करणाऱ्यांनी खरोखरच सिद्ध करून दाखवावं. मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो आणि तपास केल्यास मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाईल होते हे कळेल. पण ते हॅक केलं जातं हे सिद्ध झालं तर त्यातून खूप मोठं काही कळू शकतं,” असा खोचक टोला रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

हे ही वाचा:

राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!

मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…

भाऊ, वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत हिंदू बहिणींवर लग्नासाठी दबाव!

“आम्ही टीव्हीवर निकाल पाहत होतो. पहिले २ हजार २०० मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाले असल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. मला याबाबत निवडणूक आयोगाकडून काहीच कळवलं नव्हतं. त्यामुळे कीर्तिकर विजयी कसे होऊ शकतात याचा संशय आला. १ लाखाच्या वर मते मोजायची बाकी होती. तरीही कीर्तिकर विजयी झाल्याची बातमी चालली. मी सहा वाजता मतदान केंद्रात गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना निकालाबाबत विचारलं. तेव्हा निवडणूक अधिकारी म्हणाले, आमची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही जाहीर केलं नाही. तिथे अनेकांकडे मोबाईल होते. टीव्हीवाल्यांकडेही मोबाईल होते. मग त्या सर्वांनी मशीन हॅक केली का?” अशी माहिती वायकर यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा