महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसिद्धीसाठी आणि समाज माध्यमांवरील प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारने अनेक कोटी खर्च केल्याची बातमी समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना महिन्याला ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यावरूनच भातखळकरांनी उपरोधक ट्विट करून त्यांना ‘महाराष्ट्र मॉडेल’ कडून शिका असे लिहिले आहे.

“अहो शिवराज सिंह जी अनाथांना कसले पैसे वाटतायत, महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा. अधिक माहितीसाठी सम्पर्क  राज्याचे बेस्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया हाताळण्यासाठी वर्षाकाठी तब्बल ५ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने या संदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री सचिवालय व माहिती जनसंपर्क स्तरावरील काम बाह्य कंपनीला देण्यात आले आहे. एकीकडे राज्य कोरोनाच्या महामारीत होरपळून निघत असून याचा फटका राज्याच्या अर्थकारणालाही बसला आहे. पण अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी

शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना ५ हजार रुपये दर महिन्याला देण्याची घोषणा केली आहे. यावरूनच भातखळकरांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

Exit mobile version