टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार

टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज (२९ फेब्रुवारी) गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढच्यावर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ममता बॅनर्जी गोव्यामध्ये आल्या असून त्यांच्या उपस्थितीत लिएंडर पेस यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘लिएंडर पेस तृणमूलमध्ये प्रवेश करतोय हे तुम्हाला सांगताना आनंद होत आहे. मी खूप आनंदी आहे. लिएंडर माझा लहान भाऊ आहे. मी युवा खात्याची मंत्री असल्यापासून लिएंडरला ओळखतेय’, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

‘आता मी टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. मला राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करायची आहे. देशात बदल घडवायचा आहे. दीदी (ममता बॅनर्जी) खऱ्या चॅम्पियन आहेत’, असे लिएंडर पेस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचा पोपट रोजच बोलतो

एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण

रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

अभिनेत्री आणि समाजसेविका नफीसा अली यांनी त्याचं कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमुल काँग्रेस गोव्यामध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी काल गोव्यात दाखल झाल्या. गोव्यात सध्या भाजपा आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. मागच्या दोन टर्मपासून गोव्याची सत्ता भाजपाकडे आहे. काँग्रेस इथे कमकुवत झाली असून आप आणि तृणमूल हे दोन पक्ष स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version