‘आप’च्या समोर नेतृत्वाचे संकट

‘आप’च्या समोर नेतृत्वाचे संकट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षासमोर नेतृत्वाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचवेळी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र त्यात दिल्लीच्या तीन लोकसभा उमेदवारांची नावे नव्हती.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘आप’ने एक स्वाक्षरी मोहीम घेतली होती, तेव्हा ९० टक्के लोकांनी तुरुंगातून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार हाकला पाहिजे, असे मत मांडले होते. याची आठवण ‘आप’नेते कुमार गौतम यांनी करून दिली.

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे गेल्या कित्येक महिन्यांपासून तुरुंगात असल्यामुळे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे नेते उदयास आले आहेत. तर, केजरीवाल यांची पत्नी सुनीता याही सत्ता सांभाळू शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र यामुळे पक्षातील इतर नेते नाराज होता कामा नयेत आणि पक्ष एकजूट राहील, यासाठी पक्षातील सर्व नेत्यांचे एकमत होणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

‘जावेदने साजिदला माझ्या घरी आणले; त्याची आमच्यासमोर चौकशी करा’

कोइम्बतूरमधून अण्णामलाई यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा उद्देश काय?

तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी

आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक

‘आप’समोर आव्हान एक योग्य नेता समोर आणण्याचे असेल. जो त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीत पक्ष आणि सरकार दोन्हींचा सांभाळ करेल. पूर्व आयआरएस अधिकारी सुनीता केजरीवाल यांच्याशिवाय आतिशी आणि सौरभ भारद्वाज हेदेखील प्रबळ दावेदार आहेत. आतिशी यांच्याकडे दिल्ली सरकारमध्ये शिक्षण, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, राजस्व आणि सेवांसह अन्य खातीही आहेत. त्यांना केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानले जाते. तर, भारद्वाज हे दिल्ली मंत्रिमंडळाचे एक प्रमुख सदस्य आहेत. त्यांच्याकडे आरोग्य आणि शहरी विकासासह अन्य महत्त्वाची खाती आहेत. तेही पक्षाचा लोकप्रिय चेहरा आहेत.

Exit mobile version