देशभरातील वाढता कोविड लक्षात घेता भारत सरकारने कोविडची लस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यानंतर या निर्णयाचे श्रेय लाटण्याची अहमहमिका लागलेली दिसून आली. विविध पक्षाच्या नेत्यांनीच सुचवल्याने हे घडून आल्याचे आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले. यापूर्वी काही पक्षांकडून ही मागणी केली जात होती. मात्र या निर्णयानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि काही माध्यमांनी देखील जणू काही त्या नेत्यांनी सुचवले म्हणूनच ही लस १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
कोरोनाच्या उपचारासाठी वापरता येणार प्रॉव्हिडंट फंड
आयसीएसईच्या १०वीच्या परीक्षा रद्द
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
देशात लसीकरण सुरू झाल्यापासून विविध वयोगटासाठी ते वेगवेगळ्या टप्प्यांवर खुले करण्यात येतच होते. त्यामुळे लवकरात लवकर युवकांनाही लस मिळणार हे तर सुनिश्चितच होते, परंतु तरीही श्रेयासाठी हपापलेल्या नेत्यांनी या निर्णयाचे देखील श्रेय लाटायचा अयशस्वी प्रयत्न केला.
भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ट्वीटरवरून या नेत्यांच्या श्रेय लाटण्याच्या मनोवृत्तीवर त्यांनी निशाणा साधला आहे.
यांनी सल्ला दिला नसता तर भारतात 18 वर्षावरील वयोगटाचे लसीकरण झालेच नसते…
या शब्दात त्यांनी या नेत्यांना धारेवर धरले आहे.
यांनी सल्ला दिला नसता तर भारतात 18 वर्षावरील वयोगटाचे लसीकरण झालेच नसते… 🤓🤓🤓 pic.twitter.com/ib3vZB2V05
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021