शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच

शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच

विदर्भात सेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काल राजीनामा दिला आहे. ते स्वतः काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. आता विदर्भातील सेनेचा आणखी एक मोठा नेता आणि चार टर्मचे आमदार आशिष जैसवाल पक्षावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विदर्भात आधीच नगण्य असलेल्या शिवसेनेतून अनेक मोठे नेते बाहेर पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना सत्तेत असताना आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रकार पाहायला मिळत आहे. आशिष जैसवाल हे नागपूरमधील रामटेक या मतदारसंघाचे आमदार आहेत.

“३० वर्षे शिवसेनेत काम केलंय पण सन्मान नाही, बाहेरच्यांना मंत्रिपदं मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय नाही. त्यामुळे मनात दुःख आहे, वेदना आहेत” असं म्हणत आ. आशिष जैसवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. संधी मिळत नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचंही जैसवाल म्हणाले. विदर्भात शिवसेनेचा सध्या एकही मंत्री नाही, मग पक्ष कसा वाढणार? असा सवालही आशिष जैसवाल यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. १९९५ मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?

‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

कच्छमध्ये होणार भारतातील सर्वात मोठे सोलर पार्क

ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश म्हात्रे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

Exit mobile version