देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेतेमंडळी तसेच देशातील जनता त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. सकाळपासूनच राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासह अनेकांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी चार ट्विट करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे आवडते नेते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असे म्हणत शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. याशिवाय मोदी अशक्य कामे शक्य करून दाखवतात असंही अमित शहा म्हणाले आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गरीब कल्याण, सुशासन, विकास, राष्ट्रसुरक्षा व ऐतिहासिक सुधारों के समांतर समन्वय से @narendramodi जी ने माँ भारती को पुन: सर्वोच्च स्थान पर आसीन करने के अपने संकल्प को धरातल पर चरितार्थ किया है।
यह निर्णायक नेतृत्व और उस नेतृत्व में जनता के अटूट विश्वास के कारण ही सम्भव हो पाया है।— Amit Shah (@AmitShah) September 17, 2022
देश के सर्वप्रिय नेता व हम सभी के प्रेरणास्त्रोत प्रधानमंत्री @narendramodi जी को जन्मदिवस की शुभकामनाएं देता हूँ और ईश्वर से उनके उत्तम स्वास्थ्य व सुदीर्घ जीवन की कामना करता हूँ।
मोदी जी ने अपनी भारत प्रथम की सोच व गरीब कल्याण के संकल्प से असंभव कार्यों को संभव करके दिखाया है।— Amit Shah (@AmitShah) September 17, 2022
भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा एक विशेष व्हिडीओ बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या भवितव्याला आणि भविष्याला नवी दिशा दिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृताच्या पवित्र प्रसंगी तुम्ही ‘पंच प्राण’च्या माध्यमातून नव्या भारतीय चेतनेला आकार दिला आहे, असे म्हणत त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्व के सर्वाधिक लोकप्रिय नेता हमारे प्रधानमंत्री माननीय श्री @narendramodi जी को जन्मदिवस की सादर शुभकामनाएं।
आपके नेतृत्व ने भारत के भाग्य व भविष्य को नई दिशा दी है।
आजादी के अमृतकाल के पुनीत अवसर पर 'पंच प्रण' के माध्यम से आपने नवीन भारतीय चेतना को आकार दिया है। pic.twitter.com/w3etODsmfQ
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) September 17, 2022
गेल्या साडेसहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी अविश्रांत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत, त्यांचे कौतुक केलं आहे. भारताचे वैश्विक नेतृत्त्व, राष्ट्रविकासाचे कर्तृत्त्व,देशाला लाभलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व, आमचे नेते, राष्ट्रनेते, देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, फडणवीसांनी दिल्या आहेत. अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या साडेसहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी अविश्रांत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.#yugpurush pic.twitter.com/Gims3dkaef
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2022
भारताचे वैश्विक नेतृत्त्व,
राष्ट्रविकासाचे कर्तृत्त्व,
देशाला लाभलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व,
आमचे नेते, राष्ट्रनेते, देशाचे लाडके पंतप्रधान
मा. नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! #HappyBdayModiJi @narendramodi pic.twitter.com/lFCSXXIvtm— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2022
यांच्यासह महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक
देशातील मोठ्या संख्येने लोक नमो अँपवर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा पाठवत आहेत. देशासह जागतिक पातळीवरून देखील पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एससीओ बैठकीच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.