रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाबद्दल आपले स्पष्ट मत व्यक्त केले. विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारे दाबण्यात येणार नाही. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांना बोलण्याची पूर्ण संधी दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मात्र विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सरकार घेत नसते तर तो निर्णय सभागृहाचे अध्यक्ष घेत असतात. सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत कोणता निर्णय घेतात हे पाहायचे, असे फडणवीस म्हणाले. सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होत आहे.
फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्यात खोडा घालणार नाही. अध्यक्षांनी निर्णय द्यावा आम्ही त्या निर्णयाचा सन्मान राखू.
हे ही वाचा:
सुनील पालचे अपहरण करणारा आरोपी गजाआड!
हिंदूंवरील अत्याचारा विरोधात मुलुंड चेकनाका ते विक्रोळीत ‘मानव शृंखला अभियान’
बांगलादेशांत काली माता मंदिराची तोडफोड
सैफ अली खान म्हणाला, मोदी थकले असतील असे वाटले, पण चेहऱ्यावर तेज होते!
सोमवारपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. त्यानिमित्त प्रथेप्रमाणे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावरून फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले की, विरोधकांनी सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर वेगळे आरोप हे टाळले पाहिजे.
फडणवीस म्हणाले की, आमचे मंत्रिमंडळ सर्वसमावेशक आहे. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती यातील सर्व लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अनेक महिलांनाही संधी देण्यात आली आहे.