मला वनमंत्री करा…’या’ नेत्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

मला वनमंत्री करा…’या’ नेत्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून राज्यातील नेत्याने पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्याला वनमंत्री करावे अशी मागणी या नेत्याने पत्रातून केली आहे. सध्या राज्याचे वनमंत्री पद रिक्त असून यावर अनेक नेत्यांच्या नजरा आहेत.

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांचे नाव आल्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातले वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. तेव्हापासून महाराष्ट्राचे नवे वनमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते या मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. वनमंत्री पदी आपली वर्णी लागावी यासाठी हे नेते प्रयत्नशील आहेत. अशाच एका नेत्याने थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याला वनमंत्री बनवावे अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

आक्रमक विरोधकांमुळे संजय राठोडचा राजीनामा मंजूर

एमपीएससीची परिक्षा २१ मार्चला

ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडचा राजीनामा

हरिभाऊ राठोड असे या नेत्याचे नाव आहे. हरिभाऊ राठोड हे काँग्रेसकडून खासदार आणि विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत. २०१९ मध्ये राठोड यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. हरिभाऊ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वनमंत्री पदाची मागणी केली आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या जागी मला मुख्यमंत्री करा अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते होते. हरिभाऊ राठोड हे देखील त्याच समाजातून येतात. त्यामुळे समाजाच्या पाठिंब्याचा दाखल देत हरिभाऊंनी वनमंत्री पदावर दावा सांगितला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण आमदारकी पणाला लावली. अन्यथा काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वनमंत्री बनवावे असे राठोड यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version