पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच केरळमध्ये ६ एप्रिल पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची पटणमथिट्ट इथे सभा झाली. या सभेत मोदींनी डाव्या सरकारवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपा सुशिक्षितांना राजकारणात आणत आहे, हे लोक पाहत आहेत. मेट्रोमॅन इ. श्रीधरन यांचे राजकारणात येणे खूप काही सांगून टाकणारे आहे. त्यांनी आत्तापर्यंत देशासाठी खूप केले आहे. आता त्यांनी समाजाच्या सेवेसाठी भाजपाची निवड केली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल
घरात दोन कोविड रुग्ण असताना मुख्यमंत्री बाहेर कसे पडले?
असे सुरू होते नामांकित ब्रॅण्डसच्या बनावट दूधाचे रॅकेट
त्यांनी एलडीएफ आणि युडीएफवर हल्ला चढवताना या दोन्ही पक्षांना घराणेशाही आवडते असं म्हटले. दोन्ही युतींमध्ये घराणेशाहीचे अतोनात प्रेम दिसून येते असेही ते म्हणाले. घराणेशाहीसमोर बाकी सर्व गोष्टी बाजूला पडतात असेही त्यांनी सांगितले. एलडीएफमधल्या एका उच्च नेत्याच्या मुलाची घटना माहित असेलच. मला अधिक बोलायची गरजच नाही.
भगवान अय्यपा यांच्या भाविकांवर राज्य सरकारने लाठीमार केला होता. त्यावरून त्यांनी राज्य सरकारला टोले लगावले. ते म्हणाले, एलडीएफने काय केलं आहे? आधी त्यांनी केरळची प्रतिमा मलिन केली. नंतर त्यांनी केरळच्या श्रद्धास्थानांना त्यांच्या एजंट मार्फत उध्वस्त केलं. भगवान अय्यपांच्या भक्तांसाठी पायघड्या घालायच्या त्याच्याऐवजी त्यांचं स्वागत लाठी मारून केलं. भाविक गुन्हा नाहीत. अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.