केरळमध्ये पुन्हा डाव्यांचेच राज्य?

केरळमध्ये पुन्हा डाव्यांचेच राज्य?

डाव्यांचा गड मानल्या जाणार्‍या केरळ विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी समोर येतील. मात्र त्यापूर्वी आज एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये केरळमध्ये निकालाचं काय राजकीय चित्र असेल याची माहिती घेऊयात. ६ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत लोकांनी आपलं सरकार निवडलं आहे, ते २ मे रोजी जाहीर होईल. एक्झिट पोलनुसार सीपीआयच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) पुन्हा सत्तेत येणार आहे. मात्र युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) चांगली टक्कर दिल्याचं पोलमधून समोर येत आहे. मात्र भाजपाला याठिकाणी काही खास फायदा झालेला दिसत नाही.

केरळमधील जागा तीन विभागांच्या आधारावर विभागल्या गेल्या आहेत. त्यात मध्य केरळ, उत्तर केरळ आणि दक्षिण केरळमधील जागांचा समावेश आहे. सत्ताधारी डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ मध्य केरळमध्ये १६ ते १८ आणि उत्तर केरळमध्ये एलडीएफ ३४ ते ३६ जागा जिंकू शकते. त्याचवेळी दक्षिण केरळमध्ये एलडीएफ २१ ते २३ जागा जिंकू शकेल. अशा प्रकारे, तिन्ही मतदारसंघांत एकूण  ७१  ते ७७ जागा एलडीएफ जिंकू शकेल आणि केरळमध्ये सत्ता स्थापन करु शकेल, असा कल एक्सिट पोलमधून समोर आला आला आहे.

मध्य केरळमध्ये कॉंग्रेसप्रणित यूडीएफ (युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) २३ ते २५ आणि उत्तर केरळमध्ये २४ ते २६ जागा जिंकू शकेल. दक्षिण केरळमध्ये १५ ते १७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तीनही मतदारसंघांत यूडीएफ ६२ ते ६८ जागा जिंकू शकेल.

हे ही वाचा:

तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्पष्ट चित्र

आसाममध्ये अटीतटीची लढाई

बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

मागील निवडणुकीत केवळ १ जागा जिंकणार्‍या भाजपाला दक्षिण केरळमधून यावेळी २ जागा मिळतील आणि राज्यात केवळ दोन जागा भाजपा जिंकू शकेल असा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाला केवळ १ जागा जास्त मिळणे अपेक्षित आहे.

Exit mobile version